महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - महत्वाच्या घडामोडी

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर

By

Published : Jun 7, 2021, 5:58 AM IST

Updated : Jun 7, 2021, 6:05 AM IST

राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पाच स्थरावर अनलॉकची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये मुंबईचा समावेश तिसऱ्या स्थरात असून, सरकारच्या नियमावलीची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे. आजपासून मुंबईमधील दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

------------------------------

आजपासून बेस्ट पुर्ण क्षमतेने धावणार

बसमधील प्रत्येक सीटवर बसून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. यामुळे लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.

-------------------------------

इंधन दरवाढीविरोधात प्रदेश काँग्रेसकडून आज राज्यभर निदर्शने केले जाणार आहेत.

दिवसेंदिवस इंधर दर वाढतानाच दिसत आहेत. ही दरवाढ सामान्यांना परवडणारी नाही. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेश आज राज्यभर निदर्शने करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांनी दिली.

------------------------------------

कर्नाटक राज्यात आजपासून काही प्रमाणात अनलॉक होणार

कर्नाटक राज्यात आजपासून काही प्रमाणात अनलॉक करणार असल्याचे संकेत उपमुंख्यमंत्री सी एन अश्वथ नारायण

यांनी दिले आहेत.

------------------------------------

आजपासून दिल्लीमध्ये काही प्रमाणात अनलॉक होणार आहे.

कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारल्यामुळे काही प्रमाणात दिल्लीत अनलॉक केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

----------------------------------------

लहान मुलांवर आज लसीची चाचणी होणार

लहान मुलांवर कोवैक्सीन लसीची चाचणी होणार असल्याची माहिती एएनआने दिली आहे.

----------------------------------------

आजपासून दिल्लीत मेट्रे ५० टक्के क्षमतेने धावणार

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आता दिल्लीमध्ये मेट्रो सेवा ५० टक्के क्षमतेने धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 7, 2021, 6:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details