विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, पावसाने नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवीस विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्यात रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
दहाविच्या परिक्षेबाबद आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी
दहाविच्या परिक्षेबाबद मुंबई उच्च न्यायालय आणि राज्य सरकार यांच्यामध्ये धुमचक्री सुरू आहे. न्यायालय परिक्षा घेण्यावर तर सरकार परिक्षा न घेण्यावर ठाम आहे. आज उच्च न्यायालयात परिक्षेसंदर्भात सुनावणी होणार आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बोलावली तातडीची बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तसेच नुकतेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसही पवार यांना भेटून गेले आहेत. तर आज राष्ट्रवादीच्या आमदारांची पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
विमान प्रवास किती महागणार
विमान प्रवास किती महागणार भारतात १ जूनपासून देशांतर्गत विमानप्रवास महागणार आहे. यामध्ये ४० मिनिटांच्या प्रवासासाठी २६०० ते७८०० रुपयांपर्यंत दर आकारले जाणार आहेत.