जीएसटी परिषदेची आज बैठक
जीएसटी परिषदेची आज बैठक होणार आहे. या बैठकीत कोविड औषधे, लस आणि वैद्यकीय उपकरणांवरील करात कपात करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यांच्या महसुलात घसरण झाली असताना त्यांना देण्यात येणाऱ्या भरपाईबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
'यास' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज ओडिशा, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 'यास' चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या दौर्यावर जाणार आहेत. मोदी आधी भुवनेश्वर येथे आढावा बैठक घेतील. त्यानंतर बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर हवाई सर्वेक्षण करतील आणि त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आढावा बैठक घेतील.
दहावीच्या परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता
दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली. परीक्षांबाबत अंतिम प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. याबाबत आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.