महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर - news today

राज्यात आज होणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

news today
news today

By

Published : May 27, 2021, 6:16 AM IST

खासदार संभाजीराजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे.

शरद पवार-संभाजीराजे भेट

आज भाजपाचे काही नगरसेवक शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. याबाबतचा दावा मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

शिवसेना

भाजप शेतकर्‍यांच्या हक्कासाठी आजपासून धरणे आंदोलन करणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फणवीसांनी म्हटले आहे. तसेच, शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. त्यामुळे 1200 रुपये क्विंटल दराने व्यापार्‍यांना धान विकावे लागत आहे, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस

कोलकाता उच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे आज सकाळी 11 वाजता नारदा घोटाळ्यावर सुनावणी घेणार आहे. पश्चिम बंगाल 2016 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग टेप सार्वजनिक करण्यात आला होता. यामध्ये टीएमसीचे मंत्री आणि आमदार एका कंपनीकडून रोख पैसे घेताना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन नारदा न्यूज पोर्टलच्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी प्रसारीत केलं होतं. कोलकाता उच्च न्यायालयाने 2017 मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या स्टिंग ऑपरेशनमध्ये टीएमसीच्या 13 नेत्यांची आहेत. या 13 नेत्यांमधील काही नेते यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये सामील झाली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) सुद्धा याप्रकरणात तपास करत आहेत.

नारद घोटाळ्यावर सुनावणी होणार

मराठा समाजाची भूमिका समजून घेणार. २७ किंवा २८ मे रोजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट घेणार आहे, असे खासदार संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे

आज यास हेचक्रीवादळ झारखंडला दाखल होईल. त्यावेळी वाऱ्याची गती ६०-७० किलोमीटर प्रती तास असू शकेल. या चक्रीवादळानं ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या तटीय भागाला मोठं नुकसान झालंय. यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा आणि पश्चिम बंगालसहीत अनेक राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

यास चक्रीवादळ

आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत 1 जूनपासून लॉकडाऊन सुरूच राहणार का? काही निर्बंध शिथील होणार का? यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊन

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आज वाढदिवस.

रवी शास्त्री

तरुण तेजपाल यांच्या सुटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

तरूण तेजपाल

केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू भंडार पोर्टल आणि आयुष संजीवनी अ‍ॅप लॉन्च करणार आहेत.

किरण रिजिजू

ABOUT THE AUTHOR

...view details