महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates : चांदीच्या भावात मोठी घसरण.. सोन्याचीही किंमत झाली कमी.. जाणून घ्या आजचे दर - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र कालपासून सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा भाव आज गुरुवारी (दि. ७ जुलै) २० रुपयांनी घसरला आहे. आज मुंबईत सोन्याचा दर ५१९३० रुपये इतका आहे. तर देशातील इतर शहरांमध्ये भाववाढ झाली आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 7 JULY 2022
आजचे सोने चांदीचे दर

By

Published : Jul 7, 2022, 6:45 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९३० रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५६९ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये मुंबईत आज घट पाहावयास मिळात आहे. तर देशातील इतर शहरांमध्ये भाववाढ झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५१७१० रुपये
  • दिल्ली - ५१९३० रुपये
  • हैदराबाद - ५१९३० रुपये
  • कोलकत्ता - ५१९३० रुपये
  • लखनऊ - ५२०८० रुपये
  • मुंबई - ५१९३० रुपये
  • नागपूर - ५१९८० रुपये
  • पुणे - ५१९८० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६२५०० रुपये
  • दिल्ली - ५६९०० रुपये
  • हैदराबाद - ६२५०० रुपये
  • कोलकत्ता - ५६९०० रुपये
  • लखनऊ - ५६९०० रुपये
  • मुंबई - ५६९०० रुपये
  • नागपूर - ५६९०० रुपये
  • पुणे - ५६९०० रुपये


सोन्याच्या आयात शुल्क उपकरात वाढ :परदेशातून सोने आयात करणे आता महाग झाले आहे. केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरून 12.50 टक्के केले आहे. सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकारने ही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या घोषणेनंतर आता सोन्यावर 15 टक्के आयात शुल्क भरावे लागणार आहे. कारण 12.50 टक्के आयात शुल्काव्यतिरिक्त त्यावर 2.50 टक्के कृषी इंफ्रास्ट्रक्टर डेवलपमेंट सेसदेखील स्वतंत्रपणे आकारला जातो. त्यामुळे सोन्यावरील आयात शुल्क उपकर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे.

अशी ओळखा सोन्याची शुद्धता -सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा :Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग.. जाणून घ्या आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

For All Latest Updates

TAGGED:

gold rate

ABOUT THE AUTHOR

...view details