- आज पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भगवान बिरसा-मुंडा सिद्धू- कान्हू सन्मान यात्रा झारग्राम येथून सुरू करतील. बिटिशांविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्रसेनानींच्या सन्मानार्थ ही यात्रा आयोजित करण्यात येते. तसेच आज अमित शहा यांची सभादेखील होणार आहे.
- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची आसाममध्ये सभा होणार आहे. देशातील पाच राज्यात निवडणुका होणार असून भाजपचे मोठे नेते सध्या आसाममध्ये सभा घेत आहेत. याच पार्श्वभुमीवर जेपी नड्डा यांची देखील सभा होणार आहे.
- आज दुपारी 4 वाजता मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची महाविकास आघाडीतील सहभागी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. सचिन वाझे प्रकरण सध्या राज्यात तापत असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- मराठा आरक्षणावर आज सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेल्या 8 मार्चरोजी मराठा आरक्षणासंदर्भात पहिली ऑनलाईन सुनावणी पार पडली होती. त्यानंतर सर्वाेच्च न्यायालयाने ही सुनावणी 15 मार्च पर्यंत स्थगित केली होती.
- कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या एक वर्षापासून राज्यातील महाविद्यालये बंद करण्यात आली होती. परंतु विविध संघटना आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवरून आजपासून राज्यातील सर्व महाविद्यालये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू होणार आहे.
-
- भाजप आमदार माधुरी मिसळ यांची आज पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे. विधानसभा अधिवेशनासंदर्भात ही पत्रकार परिषद असणार आहे.
- आज यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नान पटोले हे उपस्थित राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
- कोरोनाचा वाढता प्रकोप बघता नागपूर जिल्ह्यात 15 ते 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानुसा आजपासून या लॉकडाऊनला सुरूवात होणार आहे. यादरम्यान नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर - आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर
आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर
News Today : आज 'या' घडामोडींवर असणार खास नजर
Last Updated : Mar 15, 2021, 9:12 AM IST