नवी दिल्ली : (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah ) हे आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.( Cm Basavaraj Bommai Meeting With Amit Shah )
बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीचेे बोम्मईंना पत्र :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये, अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. त्यामुळं आज अमित शाह यांच्या मध्यस्थीला यश येणार का? सीमावादाबाबत गृहमंत्री नेमके काय बोलणार हे पाहणे महत्वाचे आहे.