महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या पंचांग - SUNRISE TIME SUNSET TIME

24 मार्च 2023 चा काय आहे अमृत काळ, आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, आजचे नक्षत्र काय आहे, जाणून घ्या ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आजचे पंचांग.

Today Panchang
आजचे पंचांग

By

Published : Mar 23, 2023, 5:29 PM IST

मुंबई : भारतीय पंचांगांनुसार वेळेची आणि काळाची गणना करण्यात येते. त्यामुळेच हिंदू कॅलेंडरला वैदिक कॅलेंडर असे संबोधल्या जाते. पंचांगाची रचना पाच भाग मिळून बनवण्यात आली आहे. त्यातून तिथी, वार, नक्षत्र, योग यासह कारण आदींचा यात समावेश आहे. पंचांगामध्ये काळाची शूभ दशा, राहुकाळ, सुर्योदय, सुर्यास्त, तिथी, नक्षत्र, सूर्यासह चंद्रांची स्थिती हिंदू महिन्यांसह पक्षाची इत्यंभूत माहिती देण्यात आलेली असते. ज्योतिषी शिव मल्होत्रा यांच्याकडून आपणाला ही सगळी माहिती देण्यात येते. 24 मार्च 2023 चा अमृत काळ, आज काय असेल सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ जाणून घ्या...

आजची तारीख : 24-03-2023 शुक्रवार

ऋतू : वसंत

आजची तिथी : चैत्र शुक्ल​ तृतीया

आजचे नक्षत्र : अश्विनी

अमृतकाळ : 08:08 to 09:40

राहूकाळ : 18:15 to 19:50

सुर्योदय :06:37:00 सकाळी

सुर्यास्त : 06:48:00 सायंकाळी

सात वारांची नावे : एका आठवड्यात 7 दिवस असतात. यात सोमवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, रविवार या सात वारांचा समावेश आहे. वारांची नावे ही ग्रहाच्या नावावरुन ठेवण्यात येतात. एका आठवड्यात सात वारांचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेषत: सात वारांचा उल्लेख इंग्रजी कॅलेंडरमध्येही करण्यात येतो.

योग :नक्षत्राप्रमाणे योगाचे 27 प्रकार आहेत. सूर्य-चंद्राच्या विशेष अंतराच्या स्थितीला 'योग' म्हणतात. अंतराच्या आधारे तयार झालेल्या 27 योगांची नावे - विषकुंभ, प्रीती, आयुष्मान, सौभाग्य, शोभन, अतिगंड, सुकर्मा, धृती, शूल, गंड, वृद्धी, ध्रुव, व्याघट, हर्षन, वज्र, सिद्धी, व्यातिपात, वरीयन, परिघ, शिव , सिद्ध , साध्या , शुभ , शुक्ल , ब्रह्मा , इंद्र आणि वैधृती.

करण : एका तिथीमध्ये दोन करण असल्याचे वैदिक कॅलेंडरमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तारखेच्या पूर्वार्धात एक आणि तारखेच्या उत्तरार्धात एक असा करणचा उल्लेख करण्यात येतो. करणचे एकूण ११ नावे आहेत. त्यावरुन भद्रा या करणमध्ये शूभ काम करणे अशूभ मानण्यात आल्याची माहिती ज्योतिषी शिव मल्होत्रा यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details