नवी दिल्ली -दरवर्षी जगभरात १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो. स्मारके आणि स्थळांसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस. जगभरात हा दिवस स्मारके आणि वारसा स्थळांना भेटी, परिषदा, गोल टेबल आणि वर्तमानपत्रातील लेखांसह वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. ( World Heritage Day 2022 Theme ) हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश ग्रहावरील सांस्कृतिक वारसा आणि विविधतेबद्दल जागरूकता सर्वत्र पोहचवणे हे आहे. दरम्यान, जागतिक वारसा दिन (2022)ची थीम "वारसा आणि हवामान" ही आहे.
जागतिक वारसा दिवस 2022 थीम - (1983)पासून, स्मारके आणि साइट्सवरील आंतरराष्ट्रीय परिषदेने एक थीम सेट केली आहे. ज्यामध्ये या दिवशी त्यासंबंधी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दरम्यान, संस्थेने भागीदारांना हवामान बदलाशी लढण्यासाठी हा वारसा ज्ञानाचा स्रोत कसा असू शकतो, याबाबत माहिती देण्याचे उपक्रम दर्शविण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. (ICOMOS)च्या मते, या वर्षी चर्चा आणि कार्यक्रमांसाठी सुचविलेल्या विषयांमध्ये आपत्ती जोखीम (हवामान-प्रेरित, मानव-प्रेरित), स्थानिक वारसा, संघर्षातील वारसा, वारसा आणि लोकशाही, स्वदेशी वारसा, पवित्र जागा किंवा पवित्र वारसा यांचा समावेश आहे.
भारतातील जागतिक वारसा स्थळे -भारतात एकूण (३६९१)स्मारके आणि स्थळे आहेत. यापैकी (40 UNESCO)जागतिक वारसा स्थळे म्हणून नियुक्त आहेत, ज्यामध्ये ताजमहाल, अजिंठा लेणी आणि एलोरा लेणी यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. ( What Is The Theme Of 2022? ) जागतिक वारसा स्थळांमध्ये आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासारख्या नैसर्गिक स्थळांचाही समावेश आहे.