महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Nasa Artemis-1: नासाच्या चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणाचा आज दुसरा प्रयत्न; वाचा सविस्त - NASA lunar mission

नासा ही आपली मून मिशन 'आर्टेमिस-1' मोहिम आज शनिवार दि. (3 सप्टेंबर)रोजी पुन्हा राबवणार आहे. आज रात्री 11 वाजून 47 मिनिटांनी ही मोहिम सुरू होईल. हे नासाकडून होणारा दुसरा प्रयत्न आहे. दरम्यान, 29 ऑगस्टला रॉकेट 4 मध्ये काही इंजिनच्या अडचणी आल्यामुळे ही मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. आता आज कोलोरिडा केनेडी स्पेस सेंटरमधून चंद्रमाकडे हे रॉकेट रवाना होणार आहे.

नासाच्या चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणाचा आज दुसरा प्रयत्न
नासाच्या चंद्र मोहिमेच्या प्रक्षेपणाचा आज दुसरा प्रयत्न

By

Published : Sep 3, 2022, 5:52 PM IST

नवी दिल्ली - नासा ही आपली मून मिशन 'आर्टेमिस-1' मोहिम आज शनिवार दि. (3 सप्टेंबर)रोजी पुन्हा राबवणार आहे. आज रात्री 11 वाजून 47 मिनिटांनी ही मोहिम सुरू होईल. हे नासाकडून होणारा दुसरा प्रयत्न आहे. ( NASA's Lunar Mission ) दरम्यान, 29 ऑगस्टला रॉकेट 4 मध्ये काही इंजिनच्या अडचणी आल्यामुळे ही मोहिम पुढे ढकलण्यात आली होती. आता आज कोलोरिडा केनेडी स्पेस सेंटरमधून चंद्रमाकडे हे रॉकेट रवाना होणार आहे.

काय आहे आर्टेमिस-1 मी एन - अमेरिका 53 वर्षांनंतर आपल्या चंद्र मोहिमेद्वारे आर्टेमिसद्वारे पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. आर्टेमिस-1 हे या दिशेने पहिले पाऊल आहे. हे प्रमुख मोहिमेसाठी एक चाचणी उड्डाण आहे, जे कोणतेही अंतराळवीर पाठवणार नाही. या उड्डाणाद्वारे, शास्त्रज्ञांनी चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे शोधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का? हाही प्रश्न आह.

नासाची 'स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) मेगारॉकेट' आणि 'ओरियन क्रू कॅप्सूल' चंद्रावर पोहोचतील. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात. परंतु, यावेळी ते रिक्त असेल. हे मिशन 42 दिवस 3 तास 20 मिनिटांचे आहे, त्यानंतर ते पृथ्वीवर परत येईल. हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.

हेही वाचा -Artemis Launch postponed इंजिन खराब झाल्यामुळे आर्टेमिस लाँच पुढे ढकलण्यात आले

ABOUT THE AUTHOR

...view details