महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Shravan somvar 2022 आज शेवटचा श्रावणी सोमवार, असे करावे महादेवाचे पूजन - how to worship on Shravan Somwar

आनंदाचा, भक्तीचा श्रावण महिना बघता बघता संपत आला. श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव, समारंभ झाले. यातीलच महत्वाचे एक व्रत म्हणजे श्रावणी सोमवार व्रत Shravan somvar vrat. भगवान शंकराची पूजा करण्यासाठी श्रावणी सोमवार व्रताला श्रावणात खूप महत्त्व आहे. याच व्रताचा आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे. या चौथ्या सोमवारची शिवामूठ जव आहे.

last Shravani Somvar
शेवटचा श्रावणी सोमवार

By

Published : Aug 22, 2022, 10:24 AM IST

Updated : Aug 22, 2022, 12:15 PM IST

महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावणात अशा प्रकारे करा महादेवाची पूजा, पूजेचे नियम आणि महत्त्व देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. आनंदाचा, भक्तीचा श्रावण महिना बघता बघता संपत आला. श्रावण महिन्यात अनेक सण, उत्सव, समारंभ झाले. यातीलच महत्वाचे एक व्रत म्हणजे श्रावणी सोमवार व्रत.Shravan somvar vrat भगवान शंकराची पूजा करण्यासाठी श्रावणी सोमवार व्रताला श्रावणात खूप महत्त्व आहे. याच व्रताचा आजचा चौथा आणि शेवटचा सोमवार आहे . या चौथ्या सोमवारची शिवामूठ जव आहे.

अशी करा महादेवाची पूजा श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली, श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केला पाहिजे. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी.

शंकराला बेलाची पाने का अर्पण केली जातात?शंभो शंकराला बेलाची पाने अर्पण करण्यामागे एक कथा आहे .जी माता पार्वतींशी संबंधित आहे. असे म्हणतात की पार्वतीने शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांनी शंभो शंकरासाठी अनेक उपवास केले होते. एके दिवशी शंभो शंकर जंगलात बेलपत्राच्या झाडाखाली बसून तपश्चर्या करत होते. जेव्हा माता पार्वती शिवाच्या पूजेसाठी साहित्य आणण्यास विसरली तेव्हा तिने पडलेल्या बेलपत्राने पूजा केली. त्यामुळे शंकर अत्यंत प्रसन्न झाले. तेव्हापासून शंकराला बेलची पाने अर्पण करतात आणि माता पार्वतीने जेव्हाही शंकराची पूजा केली तेव्हा त्या शिवलिंगावर बेलची पाने अर्पण करण्यास विसरली नाही.

शिवलिंगावर बेलची पाने अर्पण केल्याने लाभ होतो भक्त शंकराची पूजा करताना जर बेलपत्र अर्पण केले तर त्यांना खूप फायदा होतो. शंकराला बेल अर्पण केल्याने त्यांच्या पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतात. यासोबतच जे पती-पत्नी मिळून महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला बेलाची पाने अर्पण करतात, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते. यासोबतच संतानसुखाची प्राप्ती होते.

हेही वाचाAja Ekadashi अजा एकादशी व्रताची कथा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Last Updated : Aug 22, 2022, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details