अयोध्या : Ram Mandir Pranpratistha ceremony: रामनगरी आयोध्येत प्रभू रामललाचा प्राणप्रतिष्ठा दिवस अगदी जवळ आलाय. प्राणप्रतिष्ठा शुभ मुहूर्तावर, पौष शुक्ल कूर्म द्वादशी, विक्रम संवत 2080, म्हणजेच सोमवार (22 जानेवारी )रोजी होणार आहे. या संदर्भात मंगळवार (16)जानेवारीपासून सहा दिवसीय विधी सुरू करण्यात आलाय. आज शुक्रवार (19)जानेवारी विधीचा चौथा दिवस आहे. याबाबत सकाळपासूनच रामभक्तांमध्ये उत्साह दिसून येतोय. आज भगवान श्रीरामाचे औषधी, केशराधिवास आणि घृताधिवास असतील. यानंतर सायंकाळी धनाधिवास संस्कार करण्यात येणार आहेत. हे सर्व विधी 21 जानेवारीपर्यंत चालणार आहेत.
मुख्य विधी : मंगळवारी विवेक सृष्टी प्रांगणात प्रायश्चित्त व कर्म कुटीची पूजा झाली. यानंतर बुधवारी कॅम्पसमध्ये रामललाच्या मूर्ती घेऊन भक्तांनी परिसरात फेरफटका मारला. त्यानंतर रामललाच्या मुर्तीची मंदिरात स्थापित करण्यात आली. याच क्रमाने आज (19 जानेवारी) सकाळी औषधी, केशराधिवास आणि घृताधिवास विधी होणार आहेत. सायंकाळी धनाधिवास सोहळा होणार आहे. सर्व विधी वाराणसीतील वैदिक विद्वान करत आहेत. या शृंखलेत 20 जानेवारीला सायंकाळी पुष्पाधिवास, तर 21 जानेवारीला सकाळी शय्याधिवास अनुष्ठानासह मध्याधीवास होणार आहे. यानंतर 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेचा मुख्य विधी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे आवरण काढून त्यांचे दर्शन घेणार आहेत.
16 जानेवारीला ईटीव्ही भारतचा दावा खरा ठरला : 16 जानेवारी रोजी, ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित करताना दावा केला होता की, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टद्वारे वितरित केल्या जात असलेल्या निमंत्रण पत्रिकेवर जे प्रभू रामाचे छायाचित्र आहे, ती प्रभू रामाची मूर्ती आहे. त्या मूर्तीला गर्भगृहात स्थान दिले जाणार आहे अशी ही बातमी होती. त्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. काल गाभ्याऱ्यात स्थापित करण्यात आलेली मूर्ती तीच आहे. २२ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूर्तीचं दर्शन घेणार आहेत.
म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी केला हा पुतळा तयार :म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती गडद रंगाची असून हातात धनुष्य बाण आहे. यासोबतच प्रभू रामाची मूर्ती लहान बाळाच्या अवतारातली आहे. मात्र, रामजन्मभूमी ट्रस्टकडून रामललाचा एकही फोटो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. यानंतर एआयने सोशल मीडिया अकाउंटवर विहिंप नेता शरद शर्मा हवाला देत एक फोटो जारी केला. यामध्ये रामललाची मूर्ती गाभाऱ्यात बसवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता.