महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'या' राशीच्या व्यक्तींना स्त्रियांकडून फायदा होईल; वाचा राशीभविष्य - जोडीदाराची साथ

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 28 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:20 AM IST

मेष :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. मनाची उदासीनता आपल्या मनात नकारात्मक विचार निर्माण करील. पण ते विचार मनातून काढून टाकावेत. पैसा खूप खर्च होईल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा.

वृषभ :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. उत्तम दांपत्यजीवनाचा आनंद मिळेल. धनलाभाची अपेक्षा करू शकता.

मिथुन :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान - प्रतिष्ठेची हानी होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. खास शौक - मजा व मनोरंजन यावर खर्च होईल. बुद्धी शांत ठेवून वागावे लागेल.

कर्क :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. प्रवास व विवाहाचे योग आहेत. प्रणयाच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. उत्तम वैवाहिक सुखाचा आनंद मिळेल.

सिंह :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आजचा दिवस जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारांसाठी अनुकूल आहे. कला व क्रीडा क्षेत्रात कौशल्य दाखविण्यासाठी दिवस उत्तम आहे.

कन्या : चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. शरीर व मन एकदम स्वस्थ राहील.

तूळ : चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. जलाशय व स्त्री वर्गापासून सावध राहावे. ईश्वराची भक्ती व गाढ चिंतन शक्ती मनाला शांती देईल.

वृश्चिक: चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्य जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्तीची भेट व धनलाभ होईल.

धनू : चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी - व्यवसायात उन्नती व मान - सन्मान प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असेल.

मकर : चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल. वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्या बरोबर चर्चेत भाग न घेणे हेच हितकर होईल.

कुंभ : चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

मीन :चंद्र 28 नोव्हेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल.

हेही वाचा :

  1. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. 'या' राशीच्या व्यक्तींना कार्यात सफलता व यश मिळेल; वाचा राशीभविष्य
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details