महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मांगलिक व सामाजिक कार्य करण्याचा योग येईल; वाचा राशीभविष्य - marathi rashi bhavishya

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 27 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 1:14 AM IST

मेष: 27 ऑक्टोबर 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.

वृषभ :27 ऑक्टोबर 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपली प्राप्ती व व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या - खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास - पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे व वडीलधार्‍यां कडून लाभ होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मिथुन : 27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामे सुद्धा सहजतेने पूर्ण होतील.

कर्क : 27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.

सिंह :27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. काळजी कमी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.

कन्या :27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.

तूळ :27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.

वृश्चिक :27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.

धनू :27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा.

मकर : 27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. मित्र व आप्त यांच्या भेटीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ : 27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.

मीन : 27 ऑक्टोबर, 2023 शुक्रवारी आज चंद्र रास बदलून मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचे वातावरण पसरेल.

हेही वाचा :

  1. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मित्र आणि प्रियजनांचा सहवास मिळेल; वाचा लव्हराशी
  2. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  3. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्ती सहलीचे यशस्वी नियोजन करतील; वाचा राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details