महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 5:11 AM IST

ETV Bharat / bharat

'या' राशीच्या कलाकार व खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल दिवस; वाचा राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 26 डिसेंबर 2023 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

मेष : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. पचना विषयीच्या तक्रारी उदभवतील. आपण ठरविलेले काम कोणाचे नुकसान तर करणार नाही ना? याकडे लक्ष द्यावे लागेल.

वृषभ : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आजचा दिवस कलाकार व खेळाडू ह्यांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी अनुकूल आहे. सरकारी कामातून फायदा होईल.

मिथुन : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय प्राप्त कराल. दिवसभर वेगाने घडणार्‍या घटनात व्यग्र राहाल.

कर्क : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. खर्च वाढतील. अवैध वर्तना पासून दूर राहणे हितावह राहील.

सिंह :आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. तरी सुद्धा स्वभावातील रागीटपणा व अहंभाव कामे बिघडवणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी राहतील.

कन्या : आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. नोकरी करणार्‍यांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. आज कोर्ट- कचेरी पासून दूर राहणे हितकर होईल.

तूळ : आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. प्राप्तीत वाढ होईल. उत्तम वैवाहिक सुख मिळेल. अविवाहीतांचे विवाह जुळतील.

वृश्चिक : आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. संततीची प्रगती ऐकून मन खूष होईल. शारीरिक स्वास्थ्य टिकून राहील. मित्र - स्नेही ह्यांच्याकडून फायदा होईल.

धनू : आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आज कोणतेही धाडस करू नका.

मकर : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. नोकरी - व्यवसायातील वातावरण प्रतिकूल राहील. नवीन संबंध जोडताना सावध राहावे.

कुंभ : आज चंद्र 26 डिसेंबर, 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. सार्वजनिक मान - सन्मान वाढेल. विवाहितांना उत्तम वैवाहिक सौख्य उपभोगता येईल. भागीदारीत लाभ संभवतो.

मीन : आज चंद्र 26 डिसेंबर 2023 च्या दिवशी कर्क राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. नोकरीत सहकारी व हाताखालचे लोक ह्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. स्वास्थ्य उत्तम राहील.

हेही वाचा :

  1. 'या' राशीच्या व्यक्तींना मित्रांकडून आनंददायी बातमी मिळेल; वाचा राशीभविष्य
  2. 'या' राशींच्या व्यक्तींना दिवस आहे शुभ फलदायी, योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य
  3. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना होईल आर्थिक फायदा, वैवाहिक जीवनात राहील गोडी; वाचा राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details