मेष : आज चंद्र वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मतभेद होण्याची शकता आहे. तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ : आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. त्यामुळं मन लावून काम कराल. आर्थिक जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल. आर्थिक आयोजन कराल. अलंकार, सौंदर्य प्रसाधने आणि मनोरंजन यावर खर्च कराल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढेल.
मिथुन :आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्यामुळं तणावग्रस्त राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. मित्र आणि कुटुंबीयांच्या बाबतीत काही घटना घडतील. कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा. आपलं बोलणं किंवा व्यवहार यामुळं कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एखादा अपघात संभवतो. आज आपला खर्च अधिक होईल. मानसिक चिंतेने मन त्रस्त होईल. वायफळ कामावर शक्ती खर्च होईल.
कर्क : आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार आणि संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. चिंता दूर होतील. मित्रांसह एखाद्या नैसर्गिक स्थळी जाण्याची योजना आखाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
सिंह : आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. खंबीर मन आणि दृढ निश्चय यामुळं प्रत्येक कार्यात सुयश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची शक्यता आहे. संपत्ती पासून लाभ होईल. कला आणि क्रीडा क्षेत्रांतील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. धनाच्या दृष्टीने सरकारी कामे सफल होतील. घराचा कागदोपत्री व्यवहार करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या : आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य आणि प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र आणि संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळं आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांमुळं आर्थिक फायदा होईल.