महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना दसऱ्याच्या निमित्तानं भेटतील मित्र व नातलग; वाचा राशीभविष्य - राशीचे दैनंदिन जीवन

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 ऑक्टोबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 5:16 AM IST

मेष :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्‍यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल. अचानक धनलाभामुळे मनाची प्रसन्नता वाढेल. दूर राहणार्‍या संतती कडून आनंददायी बातम्या मिळतील. प्रवास - पर्यटनाचे बेत यशस्वीपणे आखाल.

वृषभ :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन व मान- सन्मान प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला वसुली करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे.

मिथुन :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. वडिलांना त्रास होईल.

कर्क : 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज आपल्यावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. संतापाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी राहतील. अवैध काम व चोरी ह्या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबियांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. आर्थिक टंचाई जाणवेल. अशा वेळी मानसिक शांततेसाठी प्रयत्न करावेत.

सिंह : 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक जीवनात यश कमी प्रमाणात मिळेल.

कन्या :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. व्यापार - व्यवसायात प्रतिस्पर्धी व विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. मातुल घराण्या कडून चांगल्या बातम्या समजतील.

तूळ :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंद होईल. विचारांच्या आधिक्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे कराल.

वृश्चिक : 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. स्थावर संपत्ती व वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे. जलाशयापासून भीती राहील.

धनू :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल. नशिबाची साथ लाभेल. व्यापार - व्यवसायात प्रगती होईल.

मकर :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. स्वास्थ्य साधारण राहील. उजव्या डोळ्यास त्रास होण्याची शक्यता आहे.

कुंभ : 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. भेटवस्तूंची प्राप्ती व धनप्राप्ती होईल. संपूर्ण दिवस प्रसन्न वातावरणात घालवू शकाल.

मीन :24 ऑक्टोबर 2023 मंगळवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल. महत्वाची कागदपत्रे किंवा कोर्ट - कचेरीतील प्रकरणे ह्या पासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. आजचा दिवस आर्थिक देवाण - घेवाणीसाठी अनुकूल नाही.

हेही वाचा :

  1. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता; वाचा राशीभविष्य
  2. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचे प्रियकराच्या भेटीनं मन प्रसन्न राहील; वाचा लव्हराशी
  3. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ABOUT THE AUTHOR

...view details