या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत आजचे राशीभविष्य.
मेष : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. व्यापार - व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.
वृषभ : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.
मिथुन :आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर मनोरंजन करून आनंदात घालविण्याचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कार्यालयीन वातावरण आपणास अनुकूल असेल. मित्रांसह सहलीला जाऊ शकाल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल.
कर्क :आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. परंतु दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. प्रकृती सुधारेल. मानसिक स्वास्थ्यही ठीक राहील. नोकरीतील वातावरण अनुकूल राहील. अपुरी कामे पूर्णत्वास जातील. शत्रूवर विजय मिळवाल.विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळू शकेल.
सिंह :आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता असल्यामुळे आपणास संयमित राहावे लागेल. धन व कीर्ती यांची हानी संभवते. संतती संबंधी एखादी काळजी निर्माण होईल. बौद्धिक वाद संभवतात. आर्थिक नियोजनासाठी मात्र दिवस अनुकूल आहे.
कन्या :आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आप्तांच्या बाबतीत एखादा दुःखद प्रसंग घडण्याची शक्यता आहे. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशयापासून दूर राहावे.
तूळ : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. कुटुंबियांना आपल्यामुळे काही त्रास होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. नवीन कामाच्या सुरुवातीसाठी आपण तयार व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. एखादा प्रवास संभवतो.
वृश्चिक : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च संभवतात. प्रकृती नरम होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील.
धनु : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारेल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने दिवस आनंदात जाईल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील.
मकर : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. पत्नी व संतती ह्यांच्याकडून काही फायदा संभवतो. कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या काही सुखद प्रसंगामुळे आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मानसिक व शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. इतरांशी बोलताना गैरसमज होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आज आपण आनंद व मनोरंजनासाठी खर्च कराल.
कुंभ : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. व्यापार - व्यवसायातील प्राप्तीत वाढ होईल. सामाजिक मान - सन्मान होतील. नोकरीत वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. पदोन्नती संभवते. स्वास्थ्य ठीक राहील. व्यापारातील येणे वसूल होईल. मित्र भेटतील. रमणीय स्थळाला भेट द्याल. संततीच्या प्रगतीने आपण सुखावून जाल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील.
मीन : आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास संभवतात. परदेशातील मित्र किंवा स्वकियांशी संपर्क साधू शकाल. आज आपणास उत्साह व थकवा दोन्हीही जाणवतील. हाती घेतलेले कार्य विना अडथळा पूर्ण करू शकाल. धनलाभ संभवतो.