मेष :18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. अचानक धन लाभ होईल. हितशत्रूपासून जपून राहा. नवीन कार्यारंभ करू नका. स्त्री व पाण्यापासून जपून राहावे लागेल.
वृषभ : 18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन :18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे.
कर्क : 18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. पोटाच्या व पचनाच्या तक्रारी त्रास देतील.
सिंह :18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. जलाशया पासून जपा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका.
कन्या : 18 ऑक्टोबर, 2023 बुधवारी आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील.