मेष :13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या स्थानी असेल. आज आपणाला सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक व दांपत्य जीवनात सुख - समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज - मस्ती व मनोरंजनामुळे सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.
वृषभ : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या स्थानी असेल. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा - गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज - मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. एखादी दुर्घटना संभवते. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल.
मिथुन : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या राशीत पाचव्या स्थानी असेल. आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नीसाठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. घरात शुभकार्ये घडतील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. उत्तम भोजन व वैवाहिक सुख मिळेल.
कर्क : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या राशीत चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभं राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.
सिंह :13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या स्थानी असेल. आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रांबरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील.
कन्या : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या स्थानी असेल. कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात - निर्यात व्यापारात चांगलं यश मिळेल. परंतु वाद - विवाद, चर्चा ह्यात उग्रता दाखवू नका.
तूळ : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामं सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असेल.
वृश्चिक :13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या स्थानी असेल. आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
धनू :13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्याकडून लाभ संभवतो.
मकर : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल.
कुंभ : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
मीन : 13 नोव्हेंबर, 2023 सोमवार तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आपणास योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.
हेही वाचा :
- Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
- Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्ती जोडीदारासोबत सहलीला जाऊ शकतात; वाचा लव्हराशी
- Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना भावंडांकडून लाभ होईल; वाचा राशीभविष्य