महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना मांगलिक व सामाजिक कार्य करण्याचा योग येईल; वाचा राशीभविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 10 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 1:20 AM IST

Today Horoscope
राशीभविष्य

मेष :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. जनसंपर्क वाढेल. आपल्या व्यावसायिक क्षेत्रा बाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. सेवा कार्यासाठी दिवस अनुकूल आहे. शारीरिक आराम व मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृषभ :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. मित्र व सहकार्यांकडून काही लाभ संभवतात.

मिथुन : 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यतो वाद -विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उदभवतील. नव्या कार्याच्या आरंभात अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो.

कर्क :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील.

सिंह :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.

कन्या :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.

तूळ :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

वृश्चिक :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.

धनू : 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.

मकर :10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.

कुंभ : 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.

मीन : 10 नोव्हेंबर 2023 शुक्रवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. व्यापारातील वसुली होऊ शकेल.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक असेल; वाचा राशीभविष्य
  3. Today Love Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींचे जोडीदारासोबत नाते मजबूत होईल; वाचा लव्हराशी

ABOUT THE AUTHOR

...view details