मेष :आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपला स्वभाव हळवा झाल्याने कोणतीही बातमी ऐकून किंवा व्यवहारामुळे आपल्या भावना दुखावतील. आईच्या प्रकृतीमुळे आपण खूप चिंतित व्हाल. आपला स्वाभिमान सुद्धा दुखावला जाऊ शकतो. आपणाला थकवा जाणवेल, जेवण व झोप ह्यात अनियमितता येईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहा. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. मनःशांतीसाठी प्रयत्न करावे लागतील. स्थावर मालमत्ते विषयी चर्चा टाळणे हितावह राहील.
वृषभ : आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज चिंता कमी झाल्याने हायसे वाटेल. आज आपण भावुक व संवेदनशील झाल्याने कल्पनाशक्ती व सृजनशक्ती डोके वर काढतील. साहित्य लेखन किंवा कला क्षेत्र ह्यात आज आपण काम करू शकाल. कुटुंबियांशी विशेषतः मातेशी सुसंवाद घडेल. छोटा प्रवास संभवतो. आर्थिक गोष्टींकडे लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल.
मिथुन : आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज सुरवातीच्या त्रासा नंतर आपण ठरवलेली कामे पार पडतील व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आर्थिक योजनांमुळे आपले कीती तरी त्रास कमी होऊ लागतील. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने तेथील वातावरण चांगले राहील. मित्र किंवा प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदात भर पडेल. कुटुंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील.
कर्क : आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मित्र परिवार व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात चांगला जाईल. त्यांच्या कडून मिळालेल्या भेटवस्तू आनंदात भरच घालतील. बाहेर फिरायला जाऊ शकाल. तसेच स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकाल. काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील. पत्नीच्या सहवासात वेळ चांगला जाईल. आज शारीरिक व मानसिक आनंदाचा उपभोग घेऊ शकाल.
सिंह : आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण कोर्ट - कचेरी पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. मन चिंतातुर व बेचैन असेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. आपले बोलणे व वर्तन ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा कोणाशी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. आपण आज हळवे व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. काही गैरसमज होऊन आपले नुकसान होण्याची शक्यता आहे.
कन्या : आज चंद्र 09 ऑक्टोबर, 2023 बुधवारी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास यश, कीर्ती व लाभ मिळण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील. वाडवडील व मित्र यांच्या सहवासात आपला दिवस आनंदात जाईल. प्रवास सुद्धा संभवतो. पत्नी व संतती ह्यांच्यासह वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. संतती कडून सुखद बातम्या समजतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.