मेष :05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरुवातीला नवीन कार्यारंभ करण्यास आपण खूप उत्साहीत असाल. शारीरिक व मानसिक आरोग्य हा उत्साह द्विगुणित करेल. स्नेही, मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह एखाद्या स्नेहसंमेलनास जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र काही कारणास्तव आपली प्रकृती नरम गरम होईल. आपल्या आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाणीत सुद्धा सावध राहावे लागेल. मनाच्या उदासीनतेमुळे नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे.
वृषभ : 05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. दुपार नंतर आपण सामाजिक कार्यात जास्त रस घ्याल. मित्रां कडून लाभ होईल. स्वकीयांशी संपर्क वाढून त्यांच्याशी संबंध सुधारतील. संतती कडून एखादा लाभ संभवतो. नवीन परिचयामुळे मन आनंदित होईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन: 05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. त्यांच्यासह सहलीला जाण्याचा बेत आखाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
कर्क :05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण नियोजित कार्य करण्यास प्रेरित व्हाल. मात्र, आपणास त्यात अपेक्षित यश न मिळाल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. आपला संताप वाढेल. दुपार नंतर मात्र शारीरिक उत्साह व मानसिक खंबीरता ह्यामुळे थोडाफार आनंद मिळवू शकाल. कुटुंबियांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. घराचे नूतनीकरण करण्यात आपण स्वारस्य दाखवाल व त्या दिशेने काही पाऊल उचलाल.
सिंह :05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी शारीरिक व मानसिक आरोग्य नरम गरमच राहील. आपला संताप वाढल्याने इतरांशी मतभेद होतील. दुपार नंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी होईल. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी सुद्धा महत्त्वाच्या विषयावर विचार - विनिमय करू शकाल.
कन्या : 05 सप्टेंबर 2023 मंगळवार च्या दिवशी आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. नवीन कार्यारंभात व प्रवासात अडचणी येतील. आज कोणत्याही बाबतीत लाभ, लोभ, द्वेष, प्रेम व तिरस्कार इत्यादी भावना मनात न ठेवता सम भावना बाळगल्यास आपली कामे होऊ शकतील. एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवू शकाल. प्रकृतीच्या कटकटींमुळे हैराण व्हाल, व त्यामुळे आपला संताप वाढेल. मात्र , त्याचा प्रतिकूल परिणाम आपल्या कामावर होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या संतापामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. एखाद्या धार्मिक समारंभात सहभागी व्हाल.