महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Horoscope : तुमच्यासाठी आठवड्याचा पहिला दिवस कसा असेल? वाचा राशीभविष्य - दैनिक कुंडलीत राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 04 सप्टेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Today Horoscope
राशीभविष्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 1:29 AM IST

Updated : Sep 4, 2023, 7:44 AM IST

मेष :चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह आनंदात व उत्साहात वेळ जाईल. मातेकडून लाभ संभवतात. मित्र व संबंधितांमुळे घरातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ: चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवारच्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. कुटुंबीयांचा विरोध व रुसवा ह्यास सामोरे जावे लागेल. आज सुरू केलेले काम अपूर्ण राहील. अपेक्षेपेक्षा खर्च अधिक होईल आणि कठोर परिश्रमानंतरच यश मिळेल. एखादा अपघात संभवतो.

मिथुन: चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियांकडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात लाभ होतील. प्राप्तीत वाढ संभवते. वैवाहिक सौख्य लाभेल.

कर्क :चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कामासाठी प्रवास होतील. मातेशी संबंधात सौहार्दता राहील. सरकारी लाभ होतील. प्रकृती उत्तम राहील.

सिंह: चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. काही कारणाने आपला संताप वाढेल. परदेशात राहणार्‍या नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. संतती संबंधित व व्यावसायिक कटकटींमुळे आजचा दिवस अशांततेत जाईल.

कन्या : चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या -पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. एखादा अपघात संभवतो. खर्च वाढतील. सरकार विरोधी कृत्यापासून दूर रहा. वादापासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा.

तूळ : चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान-सम्मान होतील. रुचकर भोजनाचा आस्वाद घेता येईल. वैवाहिक सौख्याची प्राप्ती होईल.

वृश्चिक : चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी ओळखी होतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. धनलाभ होईल. कामे पूर्ण होतील.

धनू :चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कला व साहित्याकडे मनाचा कल होऊन विविध कल्पना सुचतील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे बौद्धिक चर्चे पासून दूर राहणे हितावह राहील. प्रेमीजनांसाठी आजचा दिवस अनुकूलतेचा आहे.

  • मकर : चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. कोणत्याही कामात यश मिळणे अवघड होईल. झोप पूर्ण न झाल्याने आरोग्य बिघडेल.
  • कुंभ : चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. एखादा प्रवास संभवतो.
  • मीन :चंद्र 04 सप्टेंबर 2023 सोमवार च्या दिवशी मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. खाण्या-पिण्यावर संयम ठेवावा लागेल.

हेही वाचा :

  1. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
  2. Weekly Horoscope : कसा असेल तुमचा येणारा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
  3. Today Horoscope : या राशींच्या व्यक्तींना मिळेल जनमानसात मान-सन्मान, वाचा राशीभविष्य
Last Updated : Sep 4, 2023, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details