मेष :चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. पोटाचे विकार संभवतात.
वृषभ : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल.
मिथुन : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल.
कर्क : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. अवैध गोष्टींपासून शक्यतो दूरच राहावे.
सिंह : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कन्या : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. शक्यतो भांडणा पासून दूर राहावे.
तूळ : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. भिन्नलिंगी मित्रांशी झालेली भेट आनंददायी ठरेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल.
वृश्चिक : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती झाल्याने आपले समाधान होईल.
धनू : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. प्रतिस्पर्धी व विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा.
मकर : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल. नोकरी- व्यवसायात मात्र अनुकूलता राहील. भागीदारांशी मतभेद संभवतात.
कुंभ : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल.
मीन : चंद्र 04 डिसेंबर 2023 सोमवार सिंह राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल.
हेही वाचा :
- सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
- 'या' राशीच्या व्यक्तींना स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल; वाचा राशीभविष्य
- 'या' राशीच्या व्यक्ती प्रवासाचे बेत आखतील; वाचा राशीभविष्य