मुंबई :24 कॅरेट सोन्याचा दर 58,470 रूपयांवर आला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 53,600 रूपयांवर आला आहे. गेल्या आठवड्यात सोने ५७,२०० च्या वर गेले होते. तथापि, वायदे बाजारात तो अजूनही मजबूत आहे. मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी सोने अल्प वाढीसह उघडले होते. गोल्ड फ्युचर्स रुपये 86 किंवा 0.15 टक्क्यांनी वाढून 56,868 रुपये प्रति 10 ग्रॅम वर उघडले होते. सोमवारी तो 56,782 च्या पातळीवर बंद झाला होता. चांदीचे वायदे 54 रुपये किंवा 0.08 टक्क्यांनी घसरून 68,535 रुपये प्रति किलोवर उघडले होते. मागील सत्रात तो ६८,५८९ रुपयांवर बंद झाला होता.
शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर : आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,360, 8 ग्रॅम ₹42,880, 10 ग्रॅम ₹53,600, 100 ग्रॅम ₹5,36,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,847, 8 ग्रॅम ₹46,776, 10 ग्रॅम ₹58,470, 100 ग्रॅम ₹5,84,700 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹55,050, मुंबईत ₹53,600 दिल्लीत ₹53,750 कोलकाता ₹53,600 हैदराबाद ₹53,600 आहेत. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे.