महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Gold Silver Price : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने चांदीच्या दरात मोठी वाढ; टाका एक नजर

सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

Today Gold Silver Price
सोन्या-चांदीच्या दरात आज काहीशा प्रमाणात वाढ

By

Published : Feb 2, 2023, 6:44 AM IST

मुंबई :सोन्या-चांदीच्या दरात आज काहीशा प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारच्या तुलनेत 700 ते 800 रूपयांनी वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,300, 8 ग्रॅम ₹42,400, 10 ग्रॅम ₹53,000, 100 ग्रॅम ₹5,30,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,782, 8 ग्रॅम ₹46,256, 10 ग्रॅम ₹57,820, 100 ग्रॅम ₹5,78,200 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹54,150, मुंबईत ₹53,000 दिल्लीत ₹53,150 कोलकाता ₹53,000 हैदराबाद ₹53,000 आहेत.

सोन्या-चांदीच्या दरात आज काहीशा प्रमाणात वाढ

स्वर्णरेखा नदीतून सोने बाहेर येते :भारतात शेकडो छोट्या-मोठ्या नद्या आहेत. भारतात एक नदी आहे ज्या नदीतून सोने बाहेर येते. नदीच्या आसपास राहणारे लोक सोने काढून विकतात आणि पैसे कमवतात. मात्र नदीमध्ये सोने कुठून येते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केले, पण सोने कोठून येते, हे मात्र अद्याप गूढच आहे. ही सोन्याची नदी झारखंड राज्यात वाहते आणि तिचे नाव स्वर्णरेखा नदी असे आहे. सोन्याच्या उपलब्धतेमुळे या नदीला स्वर्णरेखा नदी दिले आहे. ही नदी झारखंडशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथेही वाहते. ही नदी झारखंडची राजधानी रांचीपासून १६ किमी अंतरावर उगम पावते आणि थेट बंगालच्या उपसागरात येते. झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी ज्या भागातून जाते त्या भागात लोक पहाटेच जातात आणि वाळू गाळून सोने गोळा करतात.लोक अनेक पिढ्यांपासून सोने काढून पैसे कमवत आहेत. एवढेच नव्हे तर नदीतून सोने बाहेर काढण्यात स्त्री-पुरुषांशिवाय लहान मुलेही हे काम करतात.

चांदीचे आजचे दर :चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही वाढ झाली आहे. 29 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 73.30 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 73,300 रुपये इतका झाला आहे.कालपेक्षा आज चांदीच्या दरात काही बदल झालेला नाही.आज चांदी 1 ग्रॅम ₹73.30, 8 ग्रॅम ₹586.40, 10 ग्रॅम ₹733, 100 ग्रॅम ₹7,240, 1 किलो ₹73,330 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹760, मुंबईत ₹733, दिल्लीत ₹733, कोलकाता ₹733, बंगळुरू ₹760, हैद्राबाद ₹760 आहेत.

हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो ? :सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. अमेरिकन डॉलरच्या कामगिरीचा भारतातील सोन्याच्या दरावर खूप प्रभाव पडतो. डॉलरच्या घसरणीमुळे रुपयात, सोन्याच्या किंमतीत वाढ होईल आणि डॉलरची किंमत वाढल्यास उलट होऊ शकते.

हेही वाचा :Today Gold Silver Rate: अर्थसंकल्पापूर्वीच आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details