कोइंबतूर (तामिळनाडू): Car Exploded: आज सकाळी उक्कडम, कोईम्बतूर येथे LPG सिलिंडरच्या स्फोटामुळे कारचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.
Car Exploded: एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे कारचा स्फोट होऊन एकाचा होरपळून मृत्यू - एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याने कारचा स्फोट
Car Exploded: तामिळनाडूतील उक्कडम येथे कारमध्ये ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाल्याने कारचाही स्फोट होऊन एका जणांचा होरपळून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना घडली.
एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे कारचा स्फोट होऊन एकाचा होरपळून मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्टई इसवरन मंदिराजवळ पहाटे हा स्फोट झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. कारमधून जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
कारमधील दोन एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन कारचे दोन तुकडे झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृतांची ओळख पटू शकली नाही. फॉरेन्सिक टीमचा तपास सुरू आहे. पोलाची येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कोईम्बतूर मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आला.