महाराष्ट्र

maharashtra

तामिळनाडू: एम. के. स्टॅलिन मुख्यमंत्रिपदी विराजमान; सर्व रेशनकार्डधारकांना 2 हजारांची मदत

By

Published : May 7, 2021, 3:07 PM IST

तामिळनाडूच्या सरकारी बसचा प्रवास महिलांसाठी मोफत असणार आहे. या निर्णयाची शनिवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 1,200 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत.

एम के स्टॅलिन
एम के स्टॅलिन

चेन्नई - द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच नागरिकांसाठी पाच दिलासादायक निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांना 2 हजार रुपये मदतीचा पहिला हप्ता मदत म्हणून जाहीर केला आहे. तसेच आवीन दूध दरात कपात करण्यात आली आहे. महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

एम. के. स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीत जाहीर केलेल्या वचननाम्यांची पूर्ती करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा-कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले तब्बल एक लाख रुपये

हे आहेत एम. के. स्टॅलिन यांचे निर्णय

  1. खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांवरील उपचार हे सरकारी विमा योजनेतर्गंत होणार आहेत.
  2. द्रमुकने प्रचारादरम्यान सर्व रेशनकार्डधारकांना प्रत्येकी 4 हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. या आश्वासनानुसार एम. के. स्टॅलिन यांनी रेशनकार्डधारकांना २ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर केला आहे. त्यामुळे तामिळनाडूमधील 2,07,67,000 रेशनकार्डधारकांना एकूण 4,153.69 कोटी रुपये मिळणार आहेत.
  3. सरकारकडून पुरविण्यात येणारे आविन या दुधाचे दर 3 रुपयांनी कमी केले आहेत. या निर्णयाची 16 मे पासून अंमलबजावणी होणार आहे.
  4. तामिळनाडूच्या सरकारी बसचा प्रवास महिलांसाठी मोफत असणार आहे. या निर्णयाची शनिवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 1,200 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहेत.
  5. तुमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री' ही योजना राबविण्यासाठी स्वतंत्र विभाग आणि त्यासाठी आयएएस अधिकारी नेमण्याचा निर्णयही एम. के. स्टॅलिन यांनी मंजूर केला आहे. या योजनेंतर्गत मुख्यमंत्री स्टॅलिन 100 दिवसांमध्ये निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

हेही वाचा-मोदींचा फोन म्हणजे केवळ 'मन की बात'; झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांची टीका

द्रमुक पक्षाला 10 वर्षानंतर राज्यात सत्ता

द्रमुक पक्षाने 10 वर्षानंतर राज्यात सत्ता मिळविली आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी स्टॅलिन यांना गुप्ततेची शपथ दिली. स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी सोहळा अगदीच साधेपणाने पार पडला. या सोहळ्याला अण्णाद्रमुकचे प्रमुक ओ. पनीरसेल्वम, काँग्रेसचे पी. चिदंबरम, एमडीएमके प्रमुख वाईको आणि राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details