कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा बार उडणार आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांचे वडिल शिशिर अधिकारी यांनीही भाजपाची वाट धरली. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मेळाव्यात शिशिर अधिकारी उपस्थित होते.
शिशिर अधिकारी यांचे पूत्र सुवेंदू अधिकारी यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुवेंदू अधिकारी टीएमसी सरकारमध्ये मंत्री होते आणि ते ममता बॅनर्जी यांचे अगदी निकटचे मानले जात. त्यांच्या जाण्याने तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. ते भाजपात गेल्यानंतर शिशिर देखील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर सुवेंदू अधिकारीचा भाऊ दिव्येंदू अधिकारी पूर्व मिदनापूरमधील तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. दिब्येंदू अधिकारी यांनी आपण ममता बॅनर्जी यांचा कार्यकर्ता असून मी त्यांच्यासाठीच लढत राहणार, असे स्पष्ट केले आहे.