हैदराबाद : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्याच्या कुस्तीपटूंच्या मागणीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजपच्या नेत्यांवर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आणि त्यांची चुकीची कृत्ये लपवण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
रोहन जेटलींवर लैंगिक छळाचा आरोप : बुधवारी एका ट्विटमध्ये, महुआ मोईत्रा यांनी एका महिलेच्या आरोपांवर प्रकाश टाकला. या महिलेने दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, रोहन जेटली हे दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. महुआ मोईत्रा यांनी या ट्विटद्वारे महिलांच्या लैंगिक छळाचे आरोप असलेल्या आणि देशातील प्रमुख क्रीडा संस्थांचे नेतृत्व करणाऱ्यांना वाचवण्याच्या भाजपच्या कथित प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
भाजप नेते आणि त्यांचे नातेवाईक महिलांचा लैंगिक छळ करतात व त्यांचा प्रभाव वापरून क्रीडा संस्थांवर नियंत्रण ठेवतात. सरकारने याकडे लक्ष देणे बंद केले आहे का? दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांविरुद्ध अद्याप कोणतीही चौकशी झाली नाही. लोकपाल इंदू मल्होत्रा देखील गप्प आहेत. काय आणखी एक ब्रिजभूषण सिंह तयार होतो आहे का? - महुआ मोईत्रा, तृणमूल खासदार
काय आहे प्रकरण? : महुआ मोईत्रा यांनी आणखी एका ट्विटमध्ये रोहन जेटलींचाही समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, 'आता दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दावा करतात की तो हनी ट्रॅप होता.' यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सदर महिलेने रोहन जेटलींशी तिचे वैवाहिक कलह कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी संपर्क साधला होता. तिच्या या म्हणण्यानुसार रोहन जेटली यांनी आधी तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. परंतु नंतर त्याने माघार घेतली.
हे ही वाचा :
- Wrestlers Protest: ब्रिजभूष सिंहला अटक होणार? अनुराग ठाकूर यांच्या घरी कुस्तीपटुंची बैठक सुरू
- Wrestlers Protest : साक्षी मलिकचे ट्विट - 'आंदोलन सुरूच राहणार, सर्व बातम्या खोट्या'