नवी दिल्ली : वकील हरीश साळवे यांनी गौतम अडानी प्रकरणी हिंडनबर्ग प्रकणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर टीएमसी खासदार महुआ चांगल्याच भडकल्या आहेत. TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी भारताचे जेष्ठ वकील हरीश साळवे यांची खिल्ली उडवली आहे. हरीश साळवे यांनी, शॉर्ट सेलर फर्मची चौकशी व्हायला हवी, कारण हिंडनबर्ग अहवालामुळे अदानीचे नुकसान झाले. असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे महुआ मोईत्रा यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
MP Mahua Moitra On Harish Salve : TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी उडवली हरीश साळवेंची खिल्ली - वकील हरीश साळवे
वकील हरीश साळवे यांनी गौतम अडानी प्रकरणी हिंडनबर्ग प्रकणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर टीएमसी खासदार महुआ चांगल्याच भडकल्या आहेत. TMC खासदार महुआ मोईत्रा यांनी भारताचे जेष्ठ वकील हरीश साळवे यांची खिल्ली उडवली आहे. हरीश साळवे यांनी, शॉर्ट सेलर फर्मची चौकशी व्हायला हवी, कारण हिंडनबर्ग अहवालामुळे अदानीचे नुकसान झाले. असे वक्तव्य केले होते.
काय म्हणाले हरीश साळवे : साळवे म्हणाले की, नियामकांनी मार्केट मॅनिप्युलेशन घेतले पाहिजे. त्यांना प्रतिबंधित करून व्यापार करण्यास बंदी करायला हवी. 'आपण आपल्या मार्केटमध्ये एक उदाहरण ठेवले पाहिजे. जर एखादा अहवाल असेल तर, तो सर्व प्रथम सेबीकडे गेला पाहिजे. तसेच तो कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे गेला पाहिजे.त्यावर तपास यंत्रणा तपास करतील असे वक्तव्य केले होते. साळवे यांनी वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले होते की, जर तुम्ही अशा बातम्यांचा वापर कंपन्यांवर हल्ला करण्यासाठी करणार असाल तर सेबी गप्प बसणार नाही. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते अस्थिरतेचा फायदा घेत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना अडचणी निर्माण होत असल्याचे ते म्हणाले होते.