कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या कारवाईनंतर विरोधक मंत्री पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी जोर धरत आहे. आता तर टीएमसीमध्येही पार्थ चॅटर्जी यांना मंत्रिपद आणि पक्षाच्या सर्व पदांवरून तत्काळ हटवण्यात यावे. त्यांना पक्षातून हाकलले पाहिजे. एवढेच नाही तर कुणाल घोष म्हणाले की, जर पक्षाला माझे विधान चुकीचे वाटत असेल तर मलाही काढून टाकण्याचा पक्षाला पूर्ण अधिकार आहे. मी नेहमीच टीएमसीचा सैनिक राहीन.
अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) अर्पिताच्या दोन ठिकाणांहून रोख रकमेचे मोठे घबाड हाती लागले आहे. एक दिवसापूर्वी 27 जुलै रोजी, ईडीला कोलकाता येथील अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया येथील दुसर्या फ्लॅटमधून सुमारे 29 कोटी रोख (28.90 कोटी रुपये) आणि 5 किलो सोने सापडले होते. हे पैसे मोजण्यासाठी ईडीच्या टीमला सुमारे 10 तास लागले. धक्कादायक बाब म्हणजे अर्पिताने हे पैसे फ्लॅटच्या टॉयलेटमध्ये लपवले होते.