कोलकाता: तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी TMC general secretary Abhishek Banerjee शुक्रवारी 'कोळसा चोरी घोटाळ्याच्या' Abhishek Banerjee Coal scam caseसंदर्भात चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अभिषेक सकाळी 11 वाजता कोलकाताजवळील सॉल्ट लेकमधील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले. अभिषेक बॅनर्जी हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत.
अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करण्यासाठी, ईडीच्या पाच अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारी रात्री कोलकाता येथे पोहोचले होते. सीजीओ संकुलात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी यापूर्वीही अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी करण्यात आली Abhishek Banerjee appears before ED in Coal scam आहे.
कोळसा तस्करी घोटाळा त्याच वेळी, सीएम ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, जर त्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारच्या कोणत्याही तपास यंत्रणेकडून नोटीस मिळाली, तर त्या कायदेशीररित्या लढा देतील. कोळसा तस्करी घोटाळ्यात सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी त्यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना केंद्रीय एजन्सीच्या अधिकार्यांसमोर हजर राहण्यास सांगितले, तेव्हा बॅनर्जी यांची टिप्पणी आली. माझ्या कुटुंबाला (केंद्रीय यंत्रणांकडून) नोटीस मिळाल्यास, मी कायदेशीर लढा देईन. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. TMC general secretary Abhishek Banerjee appears before ED in Coal scam case on 2 september