नवी दिल्ली - तृणमुल पक्षाच्या खासदारांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. तृणमुल पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सोमवारी भेट घेतली. या भेटीत खासदारांनी तुषार मेहता यांना महाधिवक्ता पदावरून काढण्याची तृणमुल पक्षाने मागणी केली आहे.
तृणमुलच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, आम्ही महाधिवक्ता कार्यालय आणि तुषार मेहता यांच्या चुकीच्या वर्तनावर चिंतेत आहोत. आम्ही चुकीच्या वर्तनाबद्दल तुषार मेहता यांचा तातडीने राजीनामा मागितला आहे.
हेही वाचा-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी कात्री न मिळाल्याने थेट हाताने रिबिन तोडली
काय आहे मेहता व अधिकारी भेटीचे प्रकरण-
भाजपचे काही नेते, आमदार आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेत्यांनी १ जुलैला बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तृणमुल पक्षाचे खासदार सुखेंदू शेखर राय म्हणाले, की तुषार मेहता हे सुवेंदु अधिकारी यांची भेट घेऊ शकले नव्हते. त्यासाठी मेहता हे सुवेंदु यांची माफी मागत आहेत. अधिकारी यांना तुषार मेहता यांच्या निवासस्थानी जाण्याची कोणी परवानगी दिली होती? तुषार मेहता यांनी बार काउन्सिलच्या नियम व व्यावसायिक नीतमत्तेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून काढायला पाहिजे अशी मोईत्रा यांनी मागणी केली आहे.