महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tirupati Temple : तिरुपती मंदिराकडे 10 टन सोने, तर 15 हजार 900 कोटी रुपये रोख

भगवान वेंकटेश्वर मंदिराला (Lord Venkateshwara Temple) समर्पित असलेल्या मंदिराची एकूण संपत्ती 2.3 लाख कोटी रुपयांची असून, भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असल्याचे मानले जाते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि मंडळाने भारत सरकारच्या बाँड्स किंवा आंध्र प्रदेश सरकारी सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त निधी गुंतवण्याचा निर्णय घेतल्याचा सोशल मीडिया वृत्तांना ट्रस्टने स्पष्टपणे नकार दिला.

Tirupati Temple
तिरुपती मंदिर

By

Published : Nov 6, 2022, 5:33 PM IST

तिरुपती: (Tirupati) तिरुमाला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली. मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्याच्या मालमत्तेची यादी जाहीर केली. मंदिर ट्रस्टने सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत आणि 15,938 कोटी रुपयांच्या रोख ठेवी आहेत.

वृत्तांना ट्रस्टने स्पष्टपणे नकार दिला: भगवान वेंकटेश्वर मंदिराला समर्पित असलेल्या मंदिराची एकूण संपत्ती 2.3 लाख कोटी रुपयांची असून, भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असल्याचे मानले जाते. ट्रस्टचे अध्यक्ष आणि मंडळाने भारत सरकारच्या बाँड्स किंवा आंध्र प्रदेश सरकारी सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त निधी गुंतवण्याचा निर्णय घेतल्याचा सोशल मीडिया वृत्तांना ट्रस्टने स्पष्टपणे नकार दिला.

शेड्युल्ड बँकांकडूनच कोटेशन मागवण्यात आले: अहवाल खोटे आणि चुकीचे ठरवून, TTD, EO, धर्मा रेड्डी यांनी 30 जून 2019 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत केलेल्या गुंतवणुकी आणि सोन्याच्या ठेवींवर एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. TTD ने ट्रस्टच्या नियमांनुसार, H1 व्याज दराने शेड्यूल्ड बँकांमध्ये गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. TTD मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सोन्याच्या ठेवींसाठी सर्वोच्च क्रेडिट रेटिंग असलेल्या शेड्युल्ड बँकांकडूनच कोटेशन मागवण्यात आले होते.

मंदिराला मिळणारे उत्पन्न:तत्पूर्वी, दीड वर्षापूर्वी, TTD च्या विश्वस्त मंडळाने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती की, देशाच्या विविध भागात 960 मालमत्ता आहेत. त्यामध्ये शेतजमिनी तसेच भूखंड आणि इमारतींचा समावेश आहे. याची किंमत 50 लाख रुपये असेल, असे सांगण्यात येत आहे. सरकारी दरांनुसार 75,000 कोटी रुपये, तर बाजारमूल्य दोन ते तीन पट अधिक असल्याचा अंदाज आहे. मंदिराला मिळणारे उत्पन्न हे भाविक, व्यवसाय आणि संस्थांच्या देणग्यांमधून मिळते.

ABOUT THE AUTHOR

...view details