महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tirumala Temple: वाराणसीनंतर भाविकांची तिरुमला बालाजी मंदिरास सर्वाधिक पसंती - भाविकांची तिरुमला बालाजी मंदिरास सर्वाधिक पसंती

ओयो कल्चरल ट्रॅव्हल रिपोर्ट नुसार, तिरुमला येथील भगवान बालाजी मंदिर हे भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी देशातील दुसरे (Tirumala is second most visited temple by devotees) ठिकाण आहे.

Tirumala Temple
बालाजी मंदिरास सर्वाधिक पसंती

By

Published : Dec 27, 2022, 4:07 PM IST

तिरुमला :भारत हा असा देश आहे कि, जो त्याच्या अध्यात्मिक संस्कृती, परंपरा आणि श्रद्धेमुळे जास्त ओळखला जातो. कारण भारतात खूप लोक हे श्रद्धाळू आहेत. भारतात हिंदूंची श्रद्धा मंदिरात बसलेल्या देवाशी इतकी जोडली गेली आहे की, ते त्यासाठी काहीही करण्यास तयार आहेत. म्हणूनच भक्त त्यांच्या देवांसाठी लाखो, करोडो रुपये अर्पण करतात. मंदिरांना दान करतात आणि त्यांच्या देणग्यामुळे श्रीमंत मंदिरांच्या यादीत भारतातील शेकडो मंदिरांचा समावेश आहे. तसेच, ओयो कल्चरल ट्रॅव्हल रिपोर्ट नुसार, तिरुमला येथील भगवान बालाजी मंदिर हे भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळांपैकी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे (Tirumala is second most visited temple by devotees) ठिकाण आहे.

तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर

तिरुमला दुसऱ्या क्रमांकावर (Tirumala Temple) :ओयो कल्चरल ट्रॅव्हल या संस्थेने देशभरातील भाविकांनी भेट दिलेल्या निसर्गरम्य आणि पर्यटन स्थळांचे सर्वेक्षण केले. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळां मध्ये वाराणसीच्या मंदिराने प्रथम, तर तिरुमला ने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सरकारने कोरोना निर्बंध शिथिल केल्याने तिरुमला येथील भक्तांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तिरुपती शहरातील पर्यटकांच्या खोलीचे बुकिंग २३३ टक्क्यांनी वाढले आहे.

तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर :तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर (Tirumala Venkateswara Temple) हे तिरुपती येथे स्थित एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे. तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. समुद्रसपाटीपासून 3200 फूट उंचीवर असलेल्या तिरुमलाच्या टेकड्यांवर बांधलेले श्री व्यंकटेश्वर मंदिर हे येथील सर्वात मोठे आकर्षण आहे. अनेक शतकांपूर्वी बांधलेले हे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य आणि कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळांमध्ये तिरुमला ने दुसऱ्या क्रमांकावर आहे.

तिरुमला बालाजी मंदिरास सर्वाधिक पसंती

वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर : भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळां मध्ये वाराणसीच्या मंदिराने प्रथम क्रमांक मिळवला आहे. वाराणसीचे श्री काशी विश्वनाथ मंदिर (Varanasi Kashi Vishwanath Temple) जग प्रसिध्द आहे. त्यांना काशीचे नाथ देवता असेही म्हणतात. घाट आणि उत्तरवाहिनी गंगा आणि काशीतील मंदिरात स्थापित केलेले शिवलिंग वाराणसीला धर्म, अध्यात्म, भक्ती आणि ध्यान यांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून प्रतिष्ठा देते. काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर वाराणसीमध्ये गेल्या अनेक हजार वर्षांपासून आहे. काशी विश्वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या मंदिरात जाऊन पवित्र गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो, असे मानले जाते. आदि शंकराचार्य, संत एकनाथ, गोस्वामी तुलसीदास हे सर्वजण या मंदिराला भेट देण्यासाठी आले आहेत.

वाराणसी काशी विश्वनाथ मंदिर

शिर्डी साईबाबा मंदिर : भाविकांनी भेट दिलेल्या धार्मिक स्थळां मध्ये शिर्डीच्या मंदिराने तिसरा क्रमांक (Shirdi Saibaba Temple) मिळवला आहे. वाराणसी आणि तिरुमला नंतर तिसरा क्रमांक शिर्डीचा येतो. साईबाबा जे एक भिक्षु होते. ते 18 व्या शतकात शिर्डी येथे वास्तव्यास होते. सर्व धर्मांचे लोक साईबाबांवर विश्वास ठेवतात. जगभरात त्यांचे भक्त आहे. हजारो भाविक शिर्डीच्या साई मंदिरास भेट देण्यासाठी लांबूनलांबून येत असतात. त्यापैकी शेकडो लोक मोठ्या प्रमाणावर दान सुद्धा करतात. असे मानले जाते की, त्याचे सिंहासन ९४ किलोग्रॅम सोन्याचे आहे. हे मंदिर भारताच्या श्रीमंत मंदिरांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच भाविकांनी भेट देण्याच्या यादीत देखील हे मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

शिर्डी साईबाबा मंदि

ABOUT THE AUTHOR

...view details