देहराडून :तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली. यानंतर त्यांनी आज (गुरुवारी) महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभ मेळ्याच्या परिसराला भेट दिली. यावेळी ईटीव्ही भारतशी बोलताना ते म्हणाले, की महाकुंभ मेळ्यालाच आमचे सध्या सर्वोच्च प्राधान्य असणार आहे.
रावत म्हणाले, की महाकुंभ मेळ्याचे भव्य आयोजन करण्याला आम्ही सध्या प्राधान्य देत आहोत. यासाठी प्रशासनाना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. या पवित्र स्थळी येण्यापासून कोणालाही मज्जाव करु नये असेही निर्देश आपण दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.