महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा देण्याचे 'हे' सांगितले कारण - Assembly Elections 2022 Uttarakhand

उत्तराखंडमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने उत्तराखंड भाजपमध्ये वातावरण शांत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वरिष्ठ नेता अजय भट्ट यांना केंद्रीय संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत
माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत

By

Published : Jul 9, 2021, 7:43 PM IST

नवी दिल्ली- उत्तराखंड भाजपामध्ये कोणतेही राजकारण नाही. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वात पक्ष आणखी काम चांगले करेल, असा विश्वास उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी व्यक्त केला.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत हे राज्य मंत्री अजय भट्ट यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांची मुलाखत

प्रश्न- उत्तराखंडमध्ये खूप मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. राजकीय अस्थिरता दिसत आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल?

उत्तर- अजय भट्ट पक्षाचे वरिष्ठ नेता आहेत. त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्याने पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांचे आभार आणि अजय भट्ट यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वात विशेष कार्य होईल. पंतप्रधान मोदी हे उत्तराखंडवर विशेष ध्यान देतात.

हेही वाचा-प्रकृती अस्वस्थ सांगणाऱ्या प्रज्ञा सिंह यांच्या ठुमक्याचा व्हिडिओ व्हायरल

प्रश्न- उत्तराखंडमध्ये आजपर्यंत ७ मुख्यमंत्री बदलले आहे. सगळ्यात कमी कार्यकाळ आपला राहिला आहे. त्याबाबत विरोधी पक्ष काँग्रेसकडून राजकीय अपरिपक्वतेची टीका करण्यात येते.

उत्तर - या सर्व अफवा आहेत. काँग्रेस ही अंतर्गत कलहाने त्रस्त आहे. काँग्रेसने जनतेने नाकारले आहे. माझ्यासमोर घटनात्मक पेच होते. त्यामुळे राजीनामा दिला आहे. खासदार असल्याने आमदार होणे जरुरी होते. कोरोनाच्या काळात पोटनिवडणुका घेणे शक्य नव्हते. त्यामुळे राजीनामा द्यावा लागला आहे.

हेही वाचा-उत्तर प्रदेशात कोरोनाच्या कप्पा व्हेरियंटने रुग्णाचा मृत्यू

प्रश्न- २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल का?

उत्तर- २०२२ मध्ये भाजपला बहुमत मिळेल. सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी खूप अनुभवी, झुंझार आणि कर्तव्यनिष्ठ नेते आहेत. राज्यमंत्री अजय भट्टदेखील अनुभवी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वात आम्ही २०२२ मध्ये मोठा विजय मिळविणार आहोत.

हेही वाचा-दिलासादायक! टीसीएस ४० हजार विद्यार्थ्यांना कॅम्पसमधून देणार नोकऱ्या

ABOUT THE AUTHOR

...view details