बेंगळुरू:रेल्वे बोर्डाने शुक्रवारी म्हैसूरला बेंगळुरूशी जोडणाऱ्या टिपू एक्सप्रेसचे (Tipu express) नाव बदलून वोडेयार एक्सप्रेस (Wodeyar Express) असे केले. या नावावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या वर्षी जुलैमध्ये म्हैसूरचे खासदार प्रताप सिम्हा (Mysore MP Pratap Simha) यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांच्याकडे केलेल्या निवेदनानंतर रेल्वेने शुक्रवारी हा बदल केला. म्हैसूर आणि तालागुप्पे यांच्यातील एक्सप्रेस सेवेला राज्य कवी कुवेंपू यांच्या सन्मानार्थ नाव देण्याची विनंतीही सिम्हाने केली होती. रेल्वेने दोन्ही सूचना स्वीकारल्या असून हे आदेश शनिवारपासून लागू होतील.
Tipu Express: टिपू एक्सप्रेस नाही, आता म्हणा वोडेयार एक्सप्रेस!
रेल्वे बोर्डाने शुक्रवारी म्हैसूरला बेंगळुरूशी जोडणाऱ्या टिपू एक्सप्रेसचे (Tipu express) नाव बदलून वोडेयार एक्सप्रेस (Wodeyar Express) असे केले. या नावावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
भाजपचा भगवाकरणाचा अजेंडा असल्याची टीका: मुस्लिम राजाच्या जागी हिंदू राजघराण्याचे नाव लावण्या वरून सत्ताधारी भाजपचा राज्यात भगवाकरणाचा अजेंडा असल्याची टीका काही वर्गांकडून होते आहे. मात्र रेल्वेमंत्र्यांकडे केलेल्या याचिकेत, वोडेयारांनी त्यांच्या क्षेत्रातील रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठे योगदान दिले आहे या कारणास्तव त्यांचे नाव देण्यात आले, असा युक्तिवाद दिल्याने रेल्वे मंत्रालयाने सिम्हांची विनंती योग्य ठरवली आहे. वोडेयार हे पूर्वीच्या म्हैसूर राज्याचे हिंदू शासक होते, तर टिपू सुलतान हा श्रीरंगपट्टणाचा मुस्लिम शासक होता.
1980 मध्ये सुरू झालेली टिपू एक्सप्रेस ही म्हैसूर आणि बेंगळुरूला जोडणारी सुपरफास्ट ट्रेन आहे. ट्रेन एका लाइन मीटर गेज ट्रॅकवर 139 किमी अंतर तीन तासांपेक्षा कमी वेळात कापते.