व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस 'प्रपोज डे' म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की, 1477 मध्ये ऑस्ट्रियन आर्कड्यूक मॅक्सिमिलियनने मेरी ऑफ बरगंडीपुढे लग्नासाठी प्रस्ताव मांडला होता. हा पहिला प्रस्ताव मानला जातो. त्यानंतरच हा खास दिवस प्रचलित झाला. काही ठिकाणी असे देखील म्हटले जाते की, 1816 मध्ये या दिवशी राजकुमारी शार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले होते. तेव्हापासून प्रपोज डे साजरा केला जातो. प्रपोज डे उपक्रमाची सुरुवात या दोनपैकी कुठल्याही घटनेने झालेली असो, पण ती तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करण्याची एक उत्तम संधी देते.
'प्रपोज डे' च्या दिवशी प्रपोज कुठे आणि कसे करायचे असा संभ्रम प्रत्येक प्रियकराच्या मनात असतो. चला तर मग तुमची अडचण दूर करून काही पद्धती तुमच्याशी शेअर करूया. जेव्हा तुम्ही एकमेकांना ओळखता आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला हरकत नाही, असे जेव्हा तुम्हाला वाटते-तेव्हा या पद्धती लागू केल्या जाऊ शकतात.
हिरवेगार उद्यान किंवा समुद्रकिनारा निवडा :प्रेम व्यक्त करण्यासाठी एकांत जागा शोधली जाते, असे सर्वसाधारणपणे दिसून येते. अशा लोकांसाठी ग्रीन पार्कसोबतच तुम्ही बीचवर जाऊन तुमच्या पार्टनरला प्रपोज करू शकता. जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत बोलायला मोकळा असेल तर, तुम्ही त्याच्या आवडीची जागा निवडू शकता.
सूर्यास्त सुद्धा एक संधी देतो : व्हॅलेंटाईन डेच्या वेळी काही प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला सूर्यास्ताच्या वेळी अशा ठिकाणी घेऊन जातात, जिथे सूर्यास्त खूप प्रेक्षणीय दिसतो. तिथे मावळत्या सूर्यासमोर एका गुडघ्यावर बसून प्रेमाचा प्रस्ताव मांडणे, हा एक उत्तम अनुभव आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार नियोजन करू शकता.