महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

IAS टॉपर टीना डाबी अन् पती IAS अतहर खान यांचा घटस्फोट मंजूर - IAS कपल टीना डाबी आणि अतहर खान

IAS कपल टीना डाबी आणि अतहर खान यांचा घटस्फोट मंजूर करण्यात आला आहे. उत्तराखंडच्या मसुरीतील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीतून प्रशिक्षण झाल्यानंतर टिना आणि अतहर यांनी 2018 मध्ये लग्न केले होते. तेव्हा हे दोन तरुण आयएएस अधिकारी देशभरात चर्चेत आले होते. अतहर हा काश्मीरमधील मुस्लीम असून टीना डाबी मूळची मध्य प्रदेशातील हिंदू कुटुंबातील आहे.

Tina Dabi: IAS टॉपर टीना डाबी अन् पती अतहर खान यांचा घटस्फोट मंजूर
Tina Dabi And Athar Aamir Khan, IAS Topper Couple, Divorced

By

Published : Aug 11, 2021, 11:02 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2015 च्या परीक्षेत देशात टॉप येणाऱ्या IAS अधिकारी टीना डाबी आणि त्यांचे IAS पती अतहर आमिर उल शफी खान यांच्या घटस्फोटाला न्यायालयाची मान्यता मिळाली आहे. दोघांनी 9 महिन्यांपूर्वी जयपूरच्या कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने अर्ज दाखल केला होता. मंगळवारी न्यायालयाने यावर निर्णय दिला. यावेळी दोघेही न्यायालयात हजर झाले होते.

टीना डाबी 2015 मध्ये UPSC च्या टॉपर राहिल्या आहेत. त्याच वर्षी अतहर खान दुसऱ्या क्रमांकावर होते. ते दोघे IAS च्या प्रशिक्षणाच्या काळातच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. टीना दिल्लीच्या रहिवासी आहेत, तर अतहर जम्मू-काश्मीरचे. दोघांनी 2018मध्ये लग्नही केले. मात्र, आता हे आएएस जोडपे एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले आहेत.

टीना मूळची जयपूरचीच आहे. असं असलं तरी त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला होता. कान्वेंट ऑफ जीसस अँड मेरी स्कूलमधून त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. टीना 7 वीच्या वर्गात असताना त्यांचं संपूर्ण कुटुंब दिल्लीत शिफ्ट झालं होतं. टीना डाबी यांचे वडील जसवंत डाबी आणि आई हिमानी दोघेही इंजिनीअर आहेत.

सोशल मीडियावर केले होते 'अनफॉलो' -

टीना यांचे पती अतहर यांनी काही महिन्याआधी टीना यांना सोशल मीडिया प्लॅटफार्मवरूनही अनफॉलो केले होते. यानंतर टीना यांनीही पती अतहर यांना ट्विटरवरून अनफॉलो केले आहे.

खान आडनाव हटवलं-

लग्नानंतर आपल्या नावापुढे खान आडनाव लिहिणाऱ्या टीना यांनी काही दिवसांआधी खान हे आडनावही काढून टाकले. तसेच आपल्या इन्स्टाग्रामच्या बायोतून 'काश्मिरी सून' हा शब्द काढून टाकला आहे. टीना आणि अतहर यांनी वर्ष 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लग्न केले होते. तेव्हा टीनाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वत: ला काश्मिरी सून म्हणूनही ओळख करून दिली होती.

हेही वाचा -आमिर आणि किरण ''आझाद'', १५ वर्षांचे सहजीवन संपले, दोघांचा घटस्फोटाचा निर्णय

हेही वाचा -बिल आणि मेलिंडा गेट्स घेणार घटस्फोट; २७ वर्षांचा होता संसार

ABOUT THE AUTHOR

...view details