नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांना आवाहन केले की, पक्षाचे ऋण फेडण्याची वेळ आली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना निस्वार्थीपणे आणि शिस्तीने काम करावे लागेल. ( Congress Contemplation Camp In Rajsthan ) पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठी जादूची कांडी नाही परंतु, सर्वांनी एकजुटीने काम केले तर पक्ष नक्कीच पुढे जाईल अस त्या म्हणाल्या आहेत. काँग्रेस कार्यकारिणी (CWC) या पक्षाची सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था असलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. उदयपूरमध्ये १३-१५ मे रोजी होणारा 'नवसंकल्प चिंतन शिबिर' हा केवळ विधी नसावा, तर त्यात प्रतिबिंबित व्हायला हवे असही त्या म्हणाल्या आहेत.
"या शिबिरात सुमारे 400 लोक सहभागी होत आहेत, त्यापैकी बहुतेक संघटनेतील कोणत्या ना कोणत्या पदावर आहेत किंवा त्यांनी संस्थेत किंवा सरकारमध्ये पदे भूषवली आहेत. या शिबिरात समतोल प्रतिनिधित्व असावे, प्रत्येक बाबीतून समतोल असावा, असा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, यावर सहा गटांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे असही त्या म्हणाल्या आहेत.