नवी दिल्ली - येत्या काळात बदल घडवून आणणाऱ्या उगवत्या 100 युवा नेत्यांच्या यादीमध्ये भारतातील आणि भारतीय वंशाच्या अशा पाच व्यक्तींना स्थान मिळाले आहे. '2021 टाइम 100 नेक्स्ट' ची यादी बुधवारी प्रसिद्ध केली. यात भविष्यकाळ घडविणारे 100 उदयोन्मुख नेते समाविष्ट आहेत.
नव्या यादीत भविष्यात इतिहास घडवण्याची क्षमता असणाऱ्या जगभरातली उद्योन्मुख नेतृत्वांचा सामावेश करण्यात आला आहे. भारतातील भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. भारतीय वंशाचे इंस्टाकार्टचे संस्थापक अपूर्व मेहता, गेट अस पीपीआई या ना-नफा संस्थेचे कार्यकारी संचालक शिखा गुप्ता आणि 'नॉन-प्रॉफिट 'अपसोल्व'चे रोहन पावलुरी यांचा समावेश आहे. तसेच ट्विटरचे वकील विजया गड्डे आणि ब्रिटेनचे वित्त मंत्री ऋषि सुनक यांचाही समावेश आहे.