नवी दिल्ली - शेतकर्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करावा, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली. कृषीचा स्वतंत्र अर्थसंकल्प तयार केल्यास कृषी विकासाला चालना मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मागील दोन महिन्यांपासून शेतकरी नव्याने लागू केलेल्या शेती कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत असल्याने सरकारनेही कर्जमाफी करावी, असे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना असावी, असेही ते म्हणाले.