चंदीगड -पंजाबमध्ये लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये बॉम्ब आढळला आहे. त्यानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती डीजीपी दिनकर गुप्ता यांनी दिली.
डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले, की अमृतरसरच्या ग्रामीण भागात हँड ग्रेनेड आणि टिफिन बॉम्ब आढळला आहे. लोपोके ठाण्याजवळ असलेल्यी सीमेवरही ड्रोनही दिसले आहेत. ड्रोनचा आवाजही गावातील लोकांनी ऐकला आहे. पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे 7 बॉम्ब पाठविण्यात आले आहे. आयईडी बॉम्बमध्ये 2 ते 4 किलो आरडीएक्स आहे. हा उच्च तंत्रज्ञान वापरलेला टाईम बॉम्ब होता. याबाबत पोलिसांचे पथक तपासणी करत आहे. हे बॉम्ब 26 रिमोटने सक्रिय केले जाऊ शकतात. पोलिसांना बॉम्ब डेटोनेटरही आढळला आहे.
हेही वाचा-आता व्हॉट्सअॅपद्वारे काही सेकंदातच मिळणार कोरोना लसीकरण प्रमाणपत्र; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन-
गेल्या तीन महिन्यांपासून पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या पंजाबमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. हाय अर्लटमुळे बस, रेल्वे किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बेवारस वस्तू आढळल्यास 112 किंवा 181 क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली जाऊ शकते. डीजीपी गुप्ता यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांची बैठकही घेतली आहे. लोकांनी सहकार्य करावे, असे डीजीपी गुप्ता यांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा-आरक्षणाबाबतच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधक पाठिंबा देणार - मल्लिकार्जुन खरगे