श्रीनगर : जम्मु-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये शुक्रवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस ठार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेजही बाहेर आले आहे. यात एक हल्लेखोर रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करीत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
हल्लेखोराने रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला संशयित दहशतवाद्याचा अंदाधुंद गोळीबार
श्रीनगरला लागून असलेल्या बघाट भागात ही घटना घडली. बघाट चौकात तैनात असलेल्या पोलिसांवर संशयित दहशतवाद्याने गोळीबार केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत चौकात उभे असलेले दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळावरून ईटीव्ही भारत प्रतिनिधीचा आढावा घटनेनंतर संबंधित परिसर सील करण्यात आला असून हल्लेखोराच्या शोधासाठी मोहिम राबविली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.