महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उरी: रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; पाच एके-47, 70 हँड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त - Weapons seized with five AK-47s

भारतीय लष्कराने गुरुवारी नियंत्रण रेषेवर उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातला आहे. कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाच एके-47, आठ पिस्तुल आणि 70 हँड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहेत.

Three terrorists strangled in Rampur sector; Weapons seized with five AK-47s, 70 hand grenades
उरी: रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

By

Published : Sep 23, 2021, 6:51 PM IST

उरी - भारतीय लष्कराने गुरुवारी नियंत्रण रेषेवर उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातला आहे. अहवालानुसार, मारले गेलेले अतिरेकी अलीकडेच पाकव्याप्त काश्मिरमधून भारतात होते. या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून पाच एके -47, आठ पिस्तुल आणि 70 हँड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहेत.

तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश -

श्रीनगर येथील जनरल ऑफिसर कमांडिंग, लेफ्टिनेंट जनरल डीपी पांडे यांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांना आज सकाळी हातलंगा जंगलात काही हालचाली दिसून आल्या होत्या. दरम्यान, या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. 18 सप्टेंबरला असाच एक प्रयत्न करण्यात आला होता तो फसला होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी आणि सैन्य दलांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार

ABOUT THE AUTHOR

...view details