महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Junagadh Building Collapsed : जुनागडमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू

गुजरातमधील जुनागढमध्ये तीन मजली इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीचा पाया कमकुवत असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Junagadh Building Collapsed
जुनागडमध्ये इमारत कोसळली

By

Published : Jul 24, 2023, 10:10 PM IST

पहा व्हिडिओ

जुनागड (गुजरात) : सोमवारी दुपारी जुनागडमधील भाजी मार्केटमध्ये 40 वर्षे जुनी जीर्ण इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली चिरडून आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफचे येथे दुपारपासून शोध व बचाव कार्य सुरु आहे.

एकाच परिवारातील 3 जणांचा मृत्यू : इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यूमुखी पडलेले लोकांमध्ये एकाच परिवारातील 3 जणांचा समावेश आहे. या घटनेत वडील आणि त्यांच्या दोन मुलांसह रस्त्यावरील चहाच्या लॉरीवर काम करणाऱ्या एका मजुराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी स्थानिक पोलीस, अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच एनडीआरएफ व जुनागड जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे.

ढिगाऱ्याखाली जिवंत मांजर सापडली : मृतक जुनागडमधील खाडिया भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. ज्यांपैकी संजय दाभी (वडील), तरुण दाभी (मुलगा) आणि रवी दाभी (मुलगा) हे एकाच कुटुंबातील होते. तर चहाच्या लॉरीवर काम करणाऱ्या व्यक्तीचे नाव जीतू आहे. आश्चर्याचे म्हणजे, इमारतीचा ढिगारा साफ करताना एनडीआरएफच्या जवानांना एक मांजर जिवंत सापडली.

मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत : या घटनेवर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 'जुनागडमध्ये इमारत कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या मृतांच्या नातेवाईकांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार 4 लाख रुपयांची मदत देणार आहे', असे ट्विट त्यांनी केले आहे. या अपघातानंतर जुनागडचे आमदार संजय कोराडिया यांनी महामंडळावर टीकास्त्र सोडले आहे. जुनागड शहर व जिल्ह्यातील जीर्ण घरांना मनपा केवळ पावसाळ्यात दीर्घकाळ नोटिसा समाधानी आहे. मात्र अशा मोडकळीस आलेल्या घरांवर कडक कारवाई केली जात नाही, असे ते म्हणाले आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आज चार निष्पाप लोक अपघाताचे बळी ठरले. ज्यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील रेस्क्यू ऑपरेशन अखेर थांबवले; अद्यापही 57 बेपत्ता, 27 मृत्यू
  2. Building collapsed In Mumbai : मुंबईत इमारतीची बाल्कनी कोसळून दोघांचा मृत्यू, तीन गंभीर
  3. Thane Building Collapsed : ठाणे जिल्ह्यात इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये होतेय वाढ, जाणून घ्या गेल्या काही वर्षांमधील मोठ्या दुर्घटना

ABOUT THE AUTHOR

...view details