महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरू - हरियाणा

दिल्लीपासून जवळच असलेल्या गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत ४ ते ५ जण मलब्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/19-July-2021/12501412_k.jpg
गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, बचावकार्य सुरू

By

Published : Jul 19, 2021, 1:53 AM IST

Updated : Jul 19, 2021, 3:26 AM IST

गुरुग्राम (हरियाणा) - गुरुग्रामच्या खवासपूर भागात कोसळलेल्या तीन मजली इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीला मलब्याखालून काढण्यात आले असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आणखी दोन जण मलब्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे.

दिल्लीपासून जवळच असलेल्या गुरुग्राममध्ये तीन मजली इमारत कोसळली. या घटनेत ४ ते ५ जण मलब्याखाली अडकल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना फारुखनगरच्या खावसपुरमध्ये रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

इमारत कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली आहे. अद्याप इमारत कशामुळे अचानक कोसळली, याचे कारण समोर आलेले नाही.

बचावकार्याचे दृश्य

डीसीपी राजीव देसवाल यांनी सांगितलं की, "आम्हाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. तेव्हा अग्निशामाक दल विभाग आणि पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल होत बचावकार्याला सुरूवात केली. खावसपुरच्या कारगो डिलेक्स कंपनी परिसरात ही इमारत होती. यात काही मजूर आणि सुरक्षारक्षक राहत होते. या घटनेत ४ ते ५ जण मलब्याखाली दबले गेले असल्याचा अंदाज आहे. एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे."

गुरुग्रामचे उपायुक्त डॉ. यश गर्ग यांनी सांगितलं की, "ही घटना कळताच बचावकार्याची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अॅम्बुलेन्स आणि डॉक्टर देखील घटनास्थळी आहेत. बचावकार्य सुरू आहे."

हेही वाचा -व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट

हेही वाचा -नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड

Last Updated : Jul 19, 2021, 3:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details